बीअर झाली स्वस्त…!
ब्युरो न्यूज: ब्रिटनचे बिअर ब्रँड्स भारतात कमी पैशांत मिळणार आहेत. भारत आणि ब्रिट यांच्यातील मुक्त व्यापर करारानंतर ब्रिटनच्या बिअरवरील कर भारताने 75 टक्क्यांनी कमी केला आहे.
नेमका निर्णय काय घेण्यात आला?
याआधी भारतात ब्रिटनच्या ब्रिअरवर 150 टक्क्यांनी कर लागायचा. आता मुक्त व्यापार कराराअंतर्गत हा कर 75 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल आहे. या कराराअंतर्गत आयात शुल्काबाबत मर्यादित सवलत देण्यात आली आहे. याच निर्णयामुळे भारतात ब्रिटनचा ब्रँड असणाऱ्या बिअर अगदी स्वस्त मिळणार आहेत. त्यामुळे बिअर पिण्याची आवड असणाऱ्यांना कमी पैशांत बिअर मिळणार आहे. विशेष म्हणजे या कराराअंतर्गत फक्त बिअरच नव्हे तर ब्रिटनची अन्य उत्पादनंही स्वस्त होणार आहेत.
स्कॉच व्हिस्की झाली स्वस्त
मुक्त व्यापार कराराअंतर्गत फक्त बिअरच नव्हे तर स्कॉच व्हिस्कीवरील आयात शुल्कातही कपात करण्यात आली आहे. स्कॉच व्हिस्कीवरील 150 टक्के असलेला हा कर 75 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. याशिवाय भारतातून ब्रिटनमध्ये जाणारे कपडे, चमड्याची उत्पादनं यावरील आयात शुल्कात कपात केली आहे. मुक्त व्यापाराच्या या करारामुळे दोन्ही देशांना फायदा होणार आहे.


Subscribe










