शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाचा आरोप
२० मे रोजी कणकवली प्रांताधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
कासार्डे गावातील अवैध सिलिका वाळू उत्खननातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. हजारो हेक्टर जमीनीत सिलिकाचे उत्खनन करून १०० ते २०० फूटापर्यंत खोल जमीन खोदून पर्यावरणाचा देखील ऱ्हास केला जात आहे. त्याबाबत वारंवार तक्रार करून आणि निवेदने देऊनही प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. आर्थिक देवाण घेवाणीसाठी अथवा कोणाच्यातरी दबावाखाली प्रांताधिकारी व तहसीलदार वाळू माफियांना शासनाचा महसूल बुडविण्याची मुभा देत आहेत असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने करत जर १९ मे २०२५ रोजी पर्यंत अवैध सिलिका वाळू उत्खननावर कडक कारवाई न केल्यास २० मे २०२५ रोजी कणकवली प्रांताधिकारी कार्यालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे असा इशारा शिवसेना शिष्टमंडळाने दिला आहे त्याबाबतचे पत्र प्रांताधिकारी यांना देण्यात आले. तसेच सी. एम. ओ. कार्यालयाकडे देखील सर्व पुरावे देऊन तक्रार करणार असल्याचे शिवसेना शिष्टमंडळाने स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, रुपेश आमडोस्कर, संतोष परब उपस्थित होते.
कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सिलिका वाळू उत्खनन सुरु असून वारंवार याबाबत तक्रारी करून देखील प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने आज पुन्हा कणकवली प्रांताधिकारी कार्यालय येथे प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. आमच्या तक्रारीवर आपण कोणती कारवाई केली अशी विचारणा यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी प्रांताधिकाऱ्यांना केली.मात्र प्रांताधिकारी यांनी त्याठिकाणी उत्खनन सुरू नसल्याचे बेजबाबदार उत्तर दिले. प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी स्वतः त्याठिकाणी पाहणी करणे गरजेचे असताना प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारांना पत्र पाठवून पाहणी व चौकशी करण्यास सांगितले. आणि तहसीलदारांनी त्याहीपुढे जात मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना कासार्डे येथे पाहणी व चौकशीसाठी जाण्यास सांगितले. त्यामुळे हे सर्व अधिकारी आर्थिक देवाण घेवाणीसाठी अथवा कोणाच्यातरी दबावाखाली कारवाईबाबत एकमेकांवर चालढकल करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने केला. दरम्यान कासार्डे गावात तलाठी नेमलेला नाही अशी माहिती प्रांताधिकारी यांनी दिली. ज्यागावात मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून कोट्यवधींचा महसूल बुडविला जात आहे. पर्यावरणाची हानी केली जात आहे त्या कासार्डे गावात कारवाईसाठी तलाठी नसेल तर हि आश्चर्याची बाब आहे. कारवाई होऊ नये यासाठी मुद्दामच कासार्डे येथे तलाठी ठेवला नाही असा आरोपही वैभव नाईक यांनी यावेळी केला. कासार्डेत वाळू माफिया ट्रेडिंग च्या नावाखाली सिलिका वाळूचे अवैध उत्खनन करीत आहेत.लीज नसलेल्या जागेत उत्खनन सुरु आहे. त्याठिकाणी अनेक गोडाऊन शेड बांधल्या आहेत. त्याची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. बिनशेती केल्याशिवाय उत्खनन सुरु असून त्यातून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा शासनाच्या महसूल बुडविण्यात आला आहे. मात्र प्रांताधिकारी यांनी त्याठिकाणी उत्खनन सुरू नसल्याचे उत्तर दिल्याने शिवसेना शिष्टमंडळाने संतप्त होत प्रांताधिकारी व तहसीलदार दबावाखाली असून त्यांच्याकडून याप्रकरणात कोणतीही कारवाई होणार नाही त्यामुळे सी. एम. ओ. कार्यालयाकडे आम्ही तक्रार करणार असल्याचे शिवसेना शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106


Subscribe










