डिगस माध्यमिक विद्यालयाची १००% ची परंपरा कायम

कुडाळ : डिगस माध्यमिक विद्यालय डिगसचा २०२५ चा निकाल १००% लागला असून प्रशालेने आपली १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे.

कु. वैभवी संतोष पवार हिने ८८.२० % गुण मिळवत प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु. साक्षी अनंत सावंत (८४.२०%) व कु. विश्वास रमेश आंगणे (८१.४०%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.

सन २०२५ मध्ये एकूण १२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७ विद्यार्थी विशेष श्रेणीत तर ५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अमरसेन सावंत, सचिव भूपतसेन सावंत, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, प्र. मुख्याध्यापक अनुजा अमरसेन सावंत व सर्व संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमी आभार मानले.

error: Content is protected !!