कुडाळ : कुडाळ तालुक्यातील रामेश्वर माध्यमिक विद्यालय बावचा यावर्षीचा निकाल १०० % लागला असून कु. कोचरेकर समिधा संजय ही ८८.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. कु. परब दिया हरिश्चंद्र हिला ८६ % तर कु. सावंत पूर्व प्रसाद ८५ % गुण मिळाले असून त्यांना महाविद्यालयात अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा बहुमान मिळाला आहे.
यावर्षी प्रशालेतून परीक्षेला एकूण २२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे यावर्षीच्या परीक्षेत प्रथम ३ क्रमांक मुलींचे आले असून नारी शक्ती अग्रेसर ठरली आहे.