यश सावंत 76.17. टक्के प्राप्त करत वाणिज्य शाखेत प्रथम
संतोष हिवाळेकर पोईप
सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण या प्रशालेचा .उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2025 या कनिष्ठ महाविद्यालयातून 27 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्वच्या सर्व 27 विद्यार्थी उत्तीर्ण होत कनिष्ठ महाविदयालयाचा निकाल 100% लागला आहे.
कला शाखेमध्ये एकुण 5 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण होत
प्रथम क्रमांक आविश विनायक शेमडकर 310 गुण,द्वितीय क्रमांक सिध्दि विकास काजरेकर 283 गुण, तृतीय क्रमांक प्रियांका बाळकृष्ण मोडक 265 गुण
वाणिज्य शाखेमध्ये 22 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण होत
प्रथम क्रमांक यश संदिप सावंत 76.17टक्के, द्वितीय क्रमांक सोहम सत्यवान कासले 72.83 टक्के तृतीय क्रमांक सायली पांडुरंग चव्हाण हिला 71.83 टक्के
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री अनिल कांदळकर ,सचिव श्री विलास माधव ,उपाध्यक्ष श्री गोपीनाथ पालव ,सर्व विद्यमान संचालक, प्राचार्य/ मुख्याध्यापक श्री कुंभार सर ,सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , पंचक्रोशीतील सर्व पालक यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत













