दोडामार्ग : अखेर साटेली भेडशी येथील तो अनधिकृत मदरसा जमीनदोस्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्यात घराची परवानगी घेऊन अनधिकृत रित्या या ठिकाणी हा मदरसा चालवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हिंदुत्ववादी संघटनेने या मदरशाविरोधात आंदोलन पुकारले असता पोलिसांनी या मदरशाची झडती घेतली होती. त्यात दोन तलवारी व बिहार येथील मुस्लिम धर्मगुरू प्रशिक्षण देत असताना सापडल्यामुळे या मदरशातून अनधिकृतपणे कारवाई केल्या जात असल्याच्या प्रकाराला दुजोरा मिळाला होता. अखेर या मदरशावर हातोडा चालवून पालकमंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत कारवायांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.