प्राथमिक शाळा मधून सौ.समिधा सुर्यकांत वारंग तर माध्यमिक मधून श्री.अनिल यशवंत कासले सर यांना जाहीर
कै.सिताराम(आबा) सखाराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट ही गेली अनेक वर्षे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक प्रकारच्या उपक्रमातून जांभवडे पंचक्रोशीतील लोकांना सहाय्य करत आहे.जांभवडे पंचक्रोशीतील अनेक दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहाय्याने कोरोनाच्या काळात रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन अनेक रुग्णांना त्याचा फायदा मिळवून दिला आहे.अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य केले आहे.तसेच आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर या सारखे उपक्रम राबविले आहेत.
कै.सिताराम तर्फे हे न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे येथे अनेक वर्षे शिक्षक व नंतर पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते.त्यांना आपल्या सेवा काळात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करुन अनेक विद्यार्थी घडविले तसेच सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक कार्यातही त्यांचा सहभाग होता.शैक्षणिक कार्याची आठवण म्हणून दरवर्षी त्यांच्या नावाने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते .या वर्षीचा प्राथमिक विभाग पुरस्कार जि.प.शाळा सरस्वती मंदिर साकेडी नं१च्या उपक्रमशील शिक्षिका सौ.समिधा सुर्यकांत वारंग यांना जाहीर करण्यात आला आहे.गेली ३३वर्षे त्यांना अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने आधुनिकतेची जोड देत प्रयत्नशील आहेत.तर माध्यमिक विभागातून न्यू शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य , कवी, लेखक, निबंधकार श्री.अनिल यशवंत कासले यांना जाहीर करण्यात आला आहे.१९९८पासून त्यांनी मराठी विषयाचे तज्ञ शिक्षक म्हणून सेवा केली आहे आणि १/१२/२३पासून ते प्राचार्य पदाची धुरा सांभाळत आहेत.जांभवडे हायस्कूलच्या विविध क्षेत्रातील यशात त्यांचा वाटा आहे.सौ.समिधा वारंग आणि श्री.अनिल कासले यांचे ट्रस्टच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.सदर पुरस्कार १०/५/२५रोजी सन्मानपूर्वक जांभवडे बामणवाडी येथे वितरित केले जाणार आहेत असे ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा सिताराम तर्फे आणि सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे यांनी सांगितले आहे.














