वेताळबांबर्डे येथील श्री.देव वेतोबा मंदिराचा शिखर कलशारोहण व मूर्ती पूर्नप्रतिष्ठापना सोहळा 22 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांसह होणार साजरा..

कुडाळ : तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील श्री देव वेतोबा मंदिराच्या शिखर कलशारोहण व श्री देव वेतोबा मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना सोहळा 22 ते 25 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

22 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता श्री देव वेतोबा यांच्या नूतन मूर्तीचे सवाद्य मिरवणुकीने आगमन, सायंकाळी 6 वाजता बालगोपाल मित्र मंडळ (वेताळबांबर्डे) यांचा हरिपाठ व न्यू इंग्लिश स्कूल ( पणदूर तिठा ) च्या विद्यार्थ्यांचे गायन ,रात्री 8 वाजता श्री देव वेतोबा दशावतार मंडळ ( वेताळबांबर्डे ) यांचे नाटक,

23 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता प्रायश्चित विधी , विष्णू पूजन ,देवता पूजन गणेश पूजन , स्वातीपुण्याहवाचन ,मातृकापूजन नांदीश्राद्ध , आचार्यवरण , प्राकारशुद्धी, कौतुकाभिमंत्रण, शांतीहोम,गणेश याग, मंडपप्रतिष्ठा, जलाधिवास , दुपारी 1 वाजता महाप्रसाद ,2 वाजता ग्रामस्थांची भजने, सायंकाळी 6.30 वाजता हरिपाठ, रात्री 8 वाजता कीर्तनकार हरिहर नातू बुवा ( पुणे ) यांचे कीर्तन, हार्मोनियम पप्पू नाईक (कुडाळ ), तबला शिवाजी पवार ( गोठोस ) ,पखवाज गजानन देसाई (वालावल ) यांची संगीत साथ ,

24 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता प्राकारशुद्धी, स्नानविधी, शय्याधिवास , प्रधान देवता स्थापना, अग्निस्थापना, ग्रहस्थापना, वास्तू याग , ग्रहयाग,पर्याय होम ,दुपारी 1 वाजून 50 मिनिटे या शुभमूहूर्तावर श्री हरेकृष्ण भगवान पोळजी महाराज (आसोली) यांच्या हस्ते शिखर कलश प्रतिष्ठापना , 2 वाजता महाप्रसाद, 2.30 वाजता ग्रामस्थांची भजने, सायंकाळी 6.30 वाजता हरिपाठ, रात्री 8 श्री महालक्ष्मी कला दिंडी भजन मंडळ (इळये – देवगड ,बुवा उमेश घाडी) यांचे दिंडी भजन, 9 वाजता श्री पावणा देवी ग्रुप ( किंजवडे – देवगड ) यांचे समई नृत्य,

25 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता प्राकार शुद्धी, मंडपांतर्गत देवता पूजन, तत्व होम,8 वाजून 50 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर देव प्रतिष्ठापना , दुपारी 1. 30 वाजता महाप्रसाद ,2.30 वाजता ग्रामस्थांची भजने,3 वाजता हळदीकुंकू, सायंकाळी 5. 30 वाजता हरिपाठ,6.30 वाजता सोलो वादन – मृदुंगनाद ( सादरकर्ते – स्वामी समर्थ पखवाज क्लास (वेताळबांबर्डे ) संचालक पखवाज अलंकार महेश परब ( डीगस ) व वेताळबांबर्डे येथील शिष्य ,7.30 वाजता दीपोत्सव ,रात्री 8 वाजता पालखी प्रदक्षिणा,9 वाजता सत्कार समारंभ,10 वाजता अमृतनाथ दशावतार मंडळ ( म्हापण) यांचे कुर्मदासाची वारी नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान उपसमिती, श्री देव वेतोबा उत्सव मंडळ , समस्त बारा पाच मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.

error: Content is protected !!