वैभव नाईक, राजन तेली,संदेश पारकर,सतीश सावंत, सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती
पटवर्धन चौकात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास दिली भेट
बाबासाहेबांच्या घटनेने सामान्य माणसाला ताठ मानेने जगण्याची दिशा दिली- वैभव नाईक
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त आज कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली शहरातील बौद्धविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,राजू राठोड, महेश कोदे, उत्तम लोके, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री, सी. आर चव्हाण, रवी राणे, मिलिंद आईर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान कणकवली पटवर्धन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कणकवलीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भारतीय संविधान अमृत महोत्सव सप्ताह सोहळा कार्यक्रमाला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, सुशांत नाईक, नीलम पालव, कन्हैया पारकर, यांनी भेट दिली. यावेळी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, उत्सव समितीचे संदीप कदम, सुदीप कांबळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी वैभव नाईक म्हणाले, सामान्यातील सामान्य माणसाला ताठ मानेने जगण्याची दिशा बाबासाहेबांनी केलेल्या घटनेने दिली आहे.त्यांचे स्वप्न आज साकार झाले आहे. समता बंधुता आणि समानता मूल्यांची स्थापना त्यांनी केली. बाबासाहेबांनी आपल्याला जी शिकवण दिली त्या शिकवणीनुसार आपण सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
1
/
46


तारका या शोमध्ये काम करताना अभिमान वाटतोय #danceshow #dance #dancer

घनकचरा करवाढ विरोधात ठाकरे सेनेचा भव्य मोर्चा #dombivali #kalyan #kalyandombivali #dipeshmhatre

रवी कुडाळकर सरांमुळे आम्हाला कला सादर करता आली #danceshow #dance #dancer

तारकामुळे आम्हाला मोठ्या व्यासपीठावर कला सादर करता येईल #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून आम्हाला कला सादर करण्याची संधी - दीक्षा नाईक #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून एक मोठा धमाका होणार #danceshow #dance

घरातल्या बायकांच्या भांडणामुळे दोन्ही भाऊ वेगळे #niteshrane #uddhavthackeray #rajthackeray

म्हणजे संजय राजाराम राऊतचा बाजार उठला | Nitesh Rane #niteshrane #sanjayraut

नितेश राणे संतापले | Nitesh Rane #niteshrane #shorts #viralvideo #ytshorts

माझ्या घरात मच्छी देत नाही म्हणून मी हे आंदोलन केलं नव्हतं | Nitesh Rane #niteshrane

जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांची पत्रकार परिषद

जिल्ह्यात ११५ पदे रिक्त असताना १९ ग्रामसेवकांच्या बदल्यांना मंजुरी - वैभव नाईक #vaibhavnaik
1
/
46
