अखेर वेताळ बांबर्डे पणदूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर महायुतीचा झेंडा…


आमदार निलेश राणे तसेच जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली श्री.मंगेश वासुदेव परब यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड…


कुडाळ : वेताळ बांबर्डे पणदूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर अखेर महायुतीचा झेंडा फडकला असून आमदार निलेश राणे तसेच जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली श्री.मंगेश वासुदेव परब यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बाबुराव चव्हाण, आनंद भोगले, दीपक साईल, देवकी कदम, बाबुराव बांबर्डेकर, सत्यवान कदम भाई मुळ्ये या विद्यमान संचालकांनी सहकार्य केले.


या सोसायटीच्या निवडणुकीसाठी प्रकाश नलावडे, श्रीधर गावडे, संतोष कदम, अरुण गावडे, विनायक बांबर्डेकर, चंद्रकांत साईल, संदीप गोडकर, मोहन मयेकर यांनी संस्था बिनविरोध करण्याच्या प्रक्रियेत आपले अर्ज बिनशर्त मागे घेऊन विशेष सहकार्य केले.
यावेळी आमदार निलेशजी राणे यांच्या आदेशाप्रमाणे संस्था बिनविरोध केल्या बद्दल दादा साईल आणि देवेन सामंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.


निवडणूक प्रक्रिये दरम्यान भास्कर गावडे, अरविंद बांबर्डेकर, संतोष कदम, अवधूत सामंत, साजुराम नाईक, एकनाथ सामंत, दशरथ कदम, सुनील गायकवाड, संतोष सामंत आदि कार्यकर्ते उपस्थित होते..

error: Content is protected !!