वेंगुर्ले : किरकोळ कारणावरून वेंगुर्ले येथील मेडिकल कॉलेजच्या तिघा विद्यार्थ्यांना सोलापूर येथील तरुणांच्या जमावाकडून मारहाण करण्यात आली. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल रात्री मेडिकल कॉलेजच्या परिसरात घडली. या प्रकरणी गणेश सुग्रीव जायभाय (मूळ रा. बीड सध्या रा. वेंगुर्ले) यांने दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा प्रकार घडला याचा शोध वेंगुर्ले पोलीस घेत आहे.