अन्यथा चौथरा पाडून टाकला जाईल – ऍड. सुहास सावंत
कुडाळ : झाराप झीरो पॉईंट येथे सर्व्हिस रोड चे बांधकाम सुरु आहे सदर बांधकामामध्ये झाराप येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येत आहे. कॉन्ट्रॅक्टर याने महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरा साठी सर्व्हिस रोड च्या गटारा शेजारी पुतळ्यासाठी चौथरा उभारला आहे. सदरची जागा ही बांधकामच्या दृष्टीने सुद्धा अयोग्य आहे. सबब मराठा महासंघाच्या वतीने एक दिवशीय लक्षणिक उपोषण करण्यात आले होते. सदर उपोषनाची दखल राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाने घेतली. उपोषणाच्या ठिकानी महामार्गचे अधिकारी आले व त्यांनी मराठा महासंघाचे प्रतिनिधी, शिवप्रेमी, महामार्गचे अधिकारी यांची जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या दालनात बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल व तोपर्यंत अस्तित्वात असलेल्या पुतळ्याचे स्थलांतरण कारण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिलेले होते. यानंतर महामार्गाच्या अधिकारी यांनी मराठा महासंघाला एक ई-मेल पाठविला. सदर ई-मेल हा ब्लॅक होता. त्यात कोणताही मजकूर नमूद नव्हता. महासंघाच्या मार्फत त्वरित उलट ई-मेल करून सदर बाब महामार्गाच्या अधिकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली व त्यांना जाणीव करून देण्यात आली कि महाराजंचा पुतळा ही महाराष्ट्रातील जनतेचा अस्मितेचा विषय आहे. इतक्या हलक्या पद्धतीने सदरचा विषय हाताळू नये. सदर ई-मेलची सीसी पोलीस व जिल्हा प्रशासनास पाठविलेली आहे. परंतु प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सबब महासंघाच्या वतीने महामार्गचे अधिकारी साळुंखे यांच्याशी मोबाईल वर संपर्क केला असता त्यानी विश्वामित्र पवित्रा घेऊन सदर प्रकरणी मराठा समजाचा काही प्रश्न नाही अशी दुरुत्तरे दिली. महासंघाला अशी खात्रीशीर बातमी समजली आहे की, महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन हे पोलीस बंदोबस्त मध्ये महामार्ग नजिक गटारावर उभारणार आहे. महाराष्ट्रची अस्मितेची स्थापना गटारावर होणे हे मराठा महासंघाला मान्य नाही. सबब याबाबत मराठा महासंघाची बैठक घेण्यात आली व सदर बैठकीत ठरविण्यात आले की, या महिना अखेरपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने बैठक आयोजित करावी अन्यथा महाराजांच्या स्थापनेसाठी गटारावर उभारण्यात आलेला चौथरा पाडून टाकण्यात येईल. असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांनी दिला आहे.













