१ एप्रिल पासून बँकांच्या ६ नियमांमध्ये बदल

ब्युरो न्यूज: येणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात बँकांच्या आर्थिक व्यवहारसंबंधी ६ नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात बदल

अनेक बँकांनी त्यांच्या एटीएम पैसे काढण्याच्या धोरणांमध्ये सुधारणा केल्या आहेत. दरमहा मोफत एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत घट केली जात आहे. ग्राहकांना आता इतर बँकांच्या एटीएममधून एका महिन्यातून फक्त तीन वेळा मोफत पैसे काढण्याची परवानगी असेल. ही मर्यादा ओलांडल्यास प्रति व्यवहार20 ते 25 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

किमान बॅलेन्स

एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि इतर संस्था त्यांच्या किमान बॅलेन्स नियमात बदल करत आहेत. बँक खातं शहरी, अर्ध-शहरी किंवा ग्रामीण भागात आहे की नाही यावर ते अवलंबून असेल. निर्धारित शिल्लक न ठेवल्यास दंड आकारला जाऊ शकतो.

पॉझिटिव्ह पे सिस्टमची (पीपीएस) अंमलबजावणी

सुरक्षित व्यवहार होण्यासाठी अनेक बँका पॉझिटिव्ह पे सिस्टम (पीपीएस) सुरू करत आहेत. या सिस्टममध्ये 5 हजारांपेक्षा जास्त चेक पेमेंटसाठी व्हेरिफेशन आवश्यक आहे. प्रोसेस होण्याआधी ग्राहकांना चेक नंबर, तारीख, पैसे देणाऱ्याचे नाव आणि रक्कम यासारख्या तपशीलांची पुष्टी करणं आवश्यक असेल. यामुळे फसवणूक आणि चुका कमी होतील..

डिजिटल बँकिंगमध्ये वाढलेली वैशिष्ट्ये

डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी अॅडव्हान्स ऑनलाइन फिचर्स आणि एआय-संचालित चॅटबॉट्स लाँच केलं जात आहे, ज्यामुळे ग्राहकांना मदत मिळेल. डिजिटल व्यवहारांचं संरक्षण करण्यासाठी टू फॅक्टर व्हेरिफिकेशन आणि बायोमेट्रिक पडताळणीसारखे वाढीव सुरक्षा उपाय देखील मजबूत केले जातील.

बचत खाते आणि एफडी व्याजदरांमध्ये बदल

अनेक बँका बचत खाते आणि मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये सुधारणा करत आहेत. बचत खात्याचे व्याज आता खात्यातील शिल्लक रकमेवर अवलंबून असेल, म्हणजेच जास्त शिल्लक असल्यास चांगले दर मिळू शकतात. स्पर्धात्मक परतावा देणे आणि बचतीला प्रोत्साहन देणं हा यामागील मूळ उद्धेश आहे.

सुधारित क्रेडिट कार्ड फायदे

एसबीआय आणि आयडीएफसी फर्स्ट बँकसह प्रमुख बँका त्यांच्या सह-ब्रँडेड विस्तारा क्रेडिट कार्डमध्ये बदल करत आहेत. तिकीट व्हाउचर, नूतनीकरण भत्ते आणि माइलस्टोन रिवॉर्ड्ससारखे फायदे बंद केले जातील. अ‍ॅक्सिस बँक 18 एप्रिलपासून अशाच प्रकारचे बदल लागू करेल, ज्यामुळे त्यांच्या विस्तारा क्रेडिट कार्डधारकांवर परिणाम होईल.

error: Content is protected !!