गुढीला लागणाऱ्या बांबूची किंमत दामदुप्पट

शहरी भागात बांबूची काठी मिळणे अवघड

मराठी नववर्ष गुढी पाडवा तोंडावर येऊन ठेपले आहे. नव वर्ष संवत्सर फल काय मिळणार? हे नुतन पंचांगात नमुद केले आहेच. महाराष्ट्रात गुढी उभारुन या नववर्षाचे स्वागत करण्यात येते. मात्र, आता गुढीला लागणा-या नव्या बांबुंची किंमत दुप्पटीने वाढली आहे हेही तितकेच खरे आहे शहरी भागात तर बांबुंची काठी मिळणे दुरापास्त झाले आहे. बव्हंशी बांबुकाठी ग्रामीण भागातून मिळते. पण वाढतं प्रदुषण, माकडांचा उपद्रव, आणि काटा येणे आदी कारणांमुळे बांबुचे उत्पादन घटत चालले आहे.

कोकणात बांबुला मानगा, चिवा आदी नावानेही ओळखले जाते. हा बांबु कुंपणाच्या कडेने ऊगवतो. काही ठिकाणी याची शास्त्र शुध्द लागवड केली जाते. मात्र वाढत्या महागाई मुळे, याची लागवड करताना ब-याच अडचणींना तोंड द्यावे लागते.

मिरगानंतर कोंब येतात. त्यावेळी ते कोंब माकड- हत्ती फस्त करतात.याचा परिणाम सलग वाढीवर होतो. बांबुला बुरूड कामातही मागणी असते. रेती व्यवसाय, मांडव, स्टेज डेकोरेशन, काजु-आंबा काढण्याची काठी आदी मुळे बांबुची उचल ठेकेदार मार्फत होते.

वाढत्या महागाई मुळे बांबुंच्या किंमतीवर परिणाम होत आहे. त्यात बांबुंची बेटे हवामान व नैसर्गिक कारणांमुळे नष्ट होत आहेत.या नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीला नवीन बांबु उभारण्याची काही ठिकाणी पध्दत आहे. तर काही ठिकाणी पुनर्वापर होतो. मात्र, वरील सर्व कारणांमुळे, बांबूचे दर चढेच आहेत.

error: Content is protected !!