बी .सी.ए अभ्यासक्रमासाठी सीईटी प्रवेश परीक्षा अनिवार्य

सिंधुदुर्ग : आजवर बीसीए या पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) अनिवार्य नव्हती. मात्र शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून बीसीए/ बीबीए/बीएमएस/ अभ्यासक्रमच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे . याबद्दल पालक आणि विध्यार्थ्यांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने रीगल कॉलेज कणकवली तर्फे दि. 11 मार्च ते 20 मार्च 2025 पर्यंत या परीक्षेच्या मार्गदर्शनाकरिता मोफत कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. तसेच या परीक्षेचे फॉर्म रिगल कॉलेज कणकवली येथे 10 ते 4.30 या वेळेत मोफत भरून मिळतील.


आजवर सी ई टी नसल्यामुळे अनेक विध्यार्थी शेवटच्या टप्यात बीसीए, बीबीए, बीएमएस आदी अभ्यासक्रमांचा प्रवेश निश्चित करत होते.आता मात्र सीईटी अनिवार्य असल्याने या प्रक्रियेत नसलेल्या विध्यार्थ्यांना यापैकी एकाही अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही. यामुळे विध्यार्थ्यानी तातडीने सीईटी चा अर्ज भरावा, असे आव्हान रिगल कॉलेज कणकवलीच्या वतीने करण्यात येत आहे
सीईटी च्या नोंदणीची शेवटची तारीख 20 मार्च आहे.

नोंदणी www.mahacet.org या संकेत स्थळावर करावी.
कॉलेज संपर्क क्रमांक 7066034204,9420028849

Address-Regal college of computer application kankavlil
A/P-Janavli ,Mumbai Goa Highway,Tal-Kankavli, Dist-Sindhudurg
Website-regalcollege.in

error: Content is protected !!