कणकवली : 24 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजण्याचे दरम्यान कणकवली तालुक्यातील ओसरगांव कुलकर्णीनगर बाजुला असलेल्या कपांऊडमध्ये एका अज्ञात महिलेचा खुन करुन तो मृतदेह जाळला. त्याच दरम्यान त्या महिलेचा उजवा पाय ढोपरापासुन खाली शिल्लक असल्याबाबत फिर्यादी चंद्रहास उर्फ बबली आत्माराम राणे, वय-47 वर्षे, रा. ओसरगांव, पटेलवाडी, ता. कणकवली यांनी फिर्याद दिली होती त्यानुसार कणकवली पोलीस ठाणे गु. रजि. नं. 42/2025, भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 138 हा गुन्हा 25 फेब्रुवारी रोजी दाखल झाला होता. या खुनाचा उलगडा झाल्यानंतर याबाबतची सिंधुदुर्ग पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे माहिती दिली आहे त्यानुसार, संशयित आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे अज्ञात मयत व अज्ञात आरोपीत यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी केलेल्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व कणकवली पोलीस ठाणे यांची विशेष पथके तयार करुन संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, गोवा व कर्नाटक राज्य तसेच सांगली, कोल्हापुर, सातारा, रत्नागिरी व रायगड येथील बेपत्ता महिलांची माहिती संकलित करण्यात येत होती. दरम्यान घटनास्थळी महत्वाचे पुरावे गोळा करणेकामी फॉरेन्सिक टिमने देखील भेट दिलेली आहे.सदर गुन्हयाचा गोपनिय तपास करीत असताना 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 07.00 ते रात्रौ 09.30 वाजण्याच्या मुदतीत एक सफेद रंगाची अर्टिगा कार उभी असल्याबाबत स्थानिक नागरीकांकडुन माहिती मिळाली होती. त्याआधारे सफेद रंगाची अर्टिगा गाडीचा CCTV च्या माध्यमातुन शोध घेत असताना गाडी क्रमांक MH-07-AB-0439 अशी निष्पन्न झाली. सदर गाडी व त्यावरील चालक याचे घटनेच्या कालावधीत वास्तव्याबाबत माहिती घेत असताना नमुद गाडीतील चालकाने मयत सुजिता सुभाष सोपटे, रा. किनळे, वरचीवाडी, ता. सावंतवाडी हिला सोबत घेवुन सावंतवाडी, आंबोली, आजरा कोल्हापुर पुन्हा सावंतवाडी, कुडाळ, मालवण, कसाल, ओरोस व ओसरगांव येथे फिरत असल्याबाबत माहिती मिळुन आली. त्याअनुषंगाने संशयीत आरोपी वितोरीन रुजाय फर्नांडीस, रा. आरवली टाक, ता. वेंगुर्ला यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता आरोपी याने सदरचा गुन्हा हा पैशाच्या हव्यासापोटी केल्याचे सांगुन गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

एका कारमुळे ओसरगाव खुनातील तपासला गती
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










