कोकण सन्मान २०२५ ची बेस्ट चाईल्ड इन्फ्ल्यूएन्सर ठरली निधी वारंग

सिंधुदुर्ग : कोकण सन्मान २०२५ ची बेस्ट चाईल्ड इन्फ्ल्यूएन्सर बनण्याच्या बहुमान निधी वारंग हिला मिळाला आहे.

पालकमंत्री नितेश राणे पुरस्कृत कोकण सन्मान २०२५ चे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते. यावेळी बेस्ट चाईल्ड इन्फ्ल्यूएन्सर या कॅटेगरीमध्ये निधी वारंग, आरव आईर, कोकणकन्या सावी, शिवकन्या स्वरा यांना नामांकन मिळाले होते. परंतु दर्षकांमधून कुडाळच्या निधी वारंग हिला अधिकाधिक पसंती मिळाल्यामुळे ती कोकण सन्मान २०२५ ची बेस्ट चाईल्ड इन्फ्ल्यूएन्सर ठरली आहे.

गेल्या काही वर्षांपासून निधी इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. कोकणी पोरग्या या नावाने तिचे इंस्टाग्राम पेज असून या पेजवर तिचे विविध करमणुकीचे व्हिडिओ पहायला मिळतात. तिच्या आजवरच्या प्रवासामध्ये तिचे आई – वडील, मामा, मावशी, शिक्षक, चाहते व कुटुंबीयांची महत्त्वाची साथ लाभली आहे.

error: Content is protected !!