महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन
मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा पदभार हाती घेतल्यानंतर दत्ता सामंत यांचा झंझावात कुडाळ, मालवण मतदार संघात पाहायला मिळत आहे. दत्ता सामंत यांनी ठाकरे शिवसेनेला ठिकठिकाणी सुरुंग लावले असून शुक्रवारी गावराई गावात उबाठा युवासेना उपविभागप्रमुख साई वालावलकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तर रात्री नांदोस गावात खळा बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या माध्यमातून दत्ता सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती दिली.
मागील अडीच वर्षात महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून गावागावात विकास कामे केली असून येत्या २० नोव्हेंबरच्या निवडणुकीत निलेश राणे यांच्या धनुष्यबाण निशाणी समोरील बटण दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.गावराईमध्ये दत्तगुरु प्रकाश शिरोडकर, तुषार धाकू राऊत, धाकू महादेव राऊत, दशरथ जनार्दन जंगले, मंदार अविनाश मांजरेकर, जागृती विठ्ठल मांजरेकर, शिवाजी नाईक, रामचंद्र लवू गावडे, चंद्रकांत रामचंद्र गावडे, महेश साबाजी गावडे, किरण गावडे, सुधीर देसाई यांनी उबाठा मधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख योगेश तुळसकर, महिला तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट, चंद्रकांत राणे, अंकित नार्वेकर, विनय शिरोडकर, कृष्णाजी चिंदरकर, सौ. वेंगुर्लेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान, नांदोस गावात दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत खळा बैठक घेण्यात आली. या बैठकीत श्री. सामंत यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती देऊन कुडाळ मालवणच्या दहा वर्षे रखडलेल्या विकास कामांच्या पूर्ततेसाठी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, माजी सभापती अनिल कांदळकर, दादा नाईक, कमलेश प्रभू सरपंच माधुरी चव्हाण, कमलेश चव्हाण यांच्यासह शिवसेना, भाजपा महायुतीचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.