उद्धव ठाकरे यांची बुधवारी मालवणात जाहीर सभा

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा बुधवार दि. १३ नोव्हेंबर रोजी टोपीवाला हायस्कूल ग्राउंड मालवण येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या सभेचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या सभेनिमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!