कृषी दिनानिमित्त उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे च्या कृषिकन्या गटाने तेंडोली मधील BRC येथे सुरु केले गांडूळ खत युनिट.

तेंडोली गावातील उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे च्या विद्यार्थिनी –
कु.पल्लवी दाभोलकर, कु.नेहा प्रभुतेंडोलकर, कु.निकिता प्रभुतेंडोलकर, कु.प्रतीक्षा सुर्वे, कु.सृष्टी पेंडूरकर, कु.तन्मयी भगत, कु.पूर्वा मुरकर, कु.सिद्धी चौधरी यांनी कृषी दिनाचे औचित्य साधुन तेंडोली येथील BRC युनिट येथे गांडूळ खत प्रकल्प चालू करून तेथील शेतकऱ्यांना व बचत गटातील महिलांना प्रकल्पा बद्दल मार्गदर्शन केले. या वेळी तेथे तेंडोली फार्मर प्रोडूसर कंपनीचे सचिव संदीप प्रभू, शेतकरी व स्वमी समर्थ बचत गटाच्या महिला तसेच तेंडोली गावाच्या सरपंच Adv.अनघा तेंडोलकर मॅडम उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनी उपस्थित शेतकरी व बचत गटातील महिलांना गांडूळ खताच्या प्रक्रिये बाबत व त्याचे सेंद्रिय शेतीतील महत्व पटवून दिले.

उद्यान विद्या महाविद्यालय मूळदे येथील मृदा परीक्षण तज्ञ प्राध्यापक डॉ.विजय पळसंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरु करण्यात आला. या प्रकल्पतून प्रेरणा घेऊन बचत गटाच्या महिलांनी देखील असा प्रकल्प सुरु करण्याची इच्छा आसल्याचे व्यक्त केले.

error: Content is protected !!