शिवप्रेमी सिंधुदुर्ग आयोजित ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा २०२४ संपन्न

कुडाळ : शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वांनी उत्साहात सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

मोठा गट

प्रथम क्रमांक : नरसिंह महापुरुष मित्रमंडळ, लक्ष्मीवाडी

▪️किल्ला : रायगड

द्वितीय क्रमांक : आई केळबाई मित्र मंडळ, केळबाईवाडी

▪️किल्ला : कोंढाणा

तृतीय क्रमांक : दुर्गवेडे, नाबरवाडी

▪️किल्ला : विजयदुर्ग

उत्तेजनार्थ : जय भवानी मित्र मंडळ, वाघ सावंत टेंब

▪️किल्ला : रायगड

छोटा गट

प्रथम क्रमांक : शिवभक्त बाल मित्र मंडळ, केळबाईवाडी

▪️किल्ला : अजिंक्यतारा

द्वितीय क्रमांक : उद्धव पाटकर, कविलगाव

▪️किल्ला : सिंधुदूर्ग

तृतीय क्रमांक : शिवकन्या ग्रूप, सावंत चाळ, अयोध्या पार्क जवळ, केळबाईवाडी.

▪️किल्ला : अजिंक्यतारा

उत्तेजनार्थ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क, कुडाळ

▪️किल्ला : सिंधुदुर्ग

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून दुर्ग मावळा प्रतिष्ठान चे कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक व कार्याध्यक्ष समिल नाईक यांनी काम पहिले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आई केळबाई मंदिरात शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबरला संध्याकाळी ५.३० वाजता संपन्न होणार आहे.

प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही आपल्या शहरात शिवप्रेमी सिंधुदूर्ग संघटने तर्फे गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबरला गड किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गड किल्ले बनवणाऱ्या मावळ्यांना प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून त्यांचा उत्साह वाढेल आणि भविष्यात गड किल्ले घरोघरी मुल बनवतील. मुलांमध्ये गड किल्ले याबद्दल आदर निर्माण होईल गड किल्ले संवर्धन साठी मुले पुढे येतीलअसे उद्दिष्ट ठेवून शिवप्रेमी सिंधुदूर्ग संघटना कार्यक्रम घेत असते.

error: Content is protected !!