पाताडेवाडी उत्कर्ष मंडळाचे आयोजन
संतोष हिवाळेकर पोईप
संत शिरोमणी गुरू रविदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती सुकळवाड पाताडेवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संत रविदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रगल्भ विचार आचरणात आणण्याची गरज आजच्या काळात आहे, असे प्रतिपादन यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी व्यक्त केले.
पाताडेवाडी उत्कर्ष मंडळ अध्यक्ष संजय पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या जयंती कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, केंद्रशाळा सुकळवाड चे मुख्याध्यापक बाळकृष्ण नांदोसकर,कणकवली तालुक्याचे कार्याध्यक्ष महेंद्र चव्हाण ,विठ्ठल चव्हाण, नितीन पवार ,उत्कर्ष मंडळाचे मार्गदर्शक कृष्णा पाताडे ,सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, उपाध्यक्ष शरद पाताडे, खजिनदार सुनील पाताडे ,सल्लागार दीपक पाताडे,सदस्य शांताराम पाताडे, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पाताडे व प्रमिला पाताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संत रविदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.तसेच ढोल ताश्याच्या गजरात मानवंदना वाहण्यात आली. बाल वक्ता वेदांत पाताडे,ईश्वरी पाताडे यांनी भाषणे सादर केली.सुजित जाधव,कृष्णा पाताडे,महेंद्र चव्हाण,विठ्ठल चव्हाण,बाळकृष्ण नांदोसकर यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या विविध पदांवर नियुक्ती केलेल्या उत्कर्ष मंडळचे कार्यकर्ते विजय पाताडे,नितीन पाताडे व मनोहर पाताडे यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन मंडळाचे सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी केले.संजय पाताडे यांनी आभार मानले.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










