ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे येथे शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा…

कुडाळ : तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत येथे श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून, त्रिवार अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर गावातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषणांचे सादरीकरण करण्यात आले विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने आपले मनोगत आपली वक्तृत्व कला या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांसमोर सादर केली कला सादर करत असते वेळी केलेली वेशभूषा फारच मनमोहक होती. उपस्थितांना कौतुक करण्यास प्रवृत्त केले.

ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे व भाजप यु. मो. कुडाळ मंडल अध्यक्ष श्री रुपेश कानडे यांच्या माध्यमातून कार्यक्रमादरम्यान आपली कला सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवर गावाचे सरपंच श्री. रामचंद्र परब, उपसरपंच सौ. रोहिणी हळदणकर, ग्रा. सदस्य श्री महेंद्र मेस्त्री, श्री गुणाजी जाधव, श्री अजय डिचोलकर,श्री संतोष डिचोलकर सौ. प्रणाली साटेलकर, श्रीमती गंधाली परब, ग्रामविकास अधिकारी श्री भूषण बालम यां सर्वांच्या हस्ते तसेच गावातील ग्रामस्थ, सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी यांच्या उपस्थिती मध्ये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमानंतर तेर्सेबांबर्डे परबवाडी येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे तर्फे पूजन करून अभिवादन करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज, भवानी माता यांचा जयघोष करून या शिवजयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!