लाडक्या बहिणींसाठी नवे निकष लागू

जाणून घ्या तरच मिळतील प्रत्येक महिन्यात पैसे

ब्युरो न्यूज: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चालू झाल्यानंतर अनेक महिला भगिनींनी ह्या योजनेचा लाभ घेतला आहे. यात अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. सध्या अपात्र महिलांची पडताळणी सुरू आहे. पात्र महिलांनाच लाभ मिळवा यासाठी सरकारकडून आता कठोर पाऊले उचलली जात आहे. प्रत्येक महिन्यात तिसऱ्या आठवड्यात लाभ लाडकी बहीण योजनेबाबत आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या योजनेचा फायदा पात्र महिलांनाच मिळवा यासाठी काही नवे नियम देखील लागू केले जाण्याची शक्यता आहे.

काय आहेत निकष?

मिळालेल्या महितीनुसार लाडक्या बहिणींना आता दर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात लाभ मिळणार आहे. लाभार्थी महिला हयात आहे की नाही हे देखील तपासले जाणार आहे. यासाठी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ईकेवायसी करणे अनिवार्य करण्यात येणार आहे.दरवर्षी ईकेवायसी करणे अनिवार्य लाडकी बहिणी योजनेच्या नव्या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हप्ता मिळणार आहे. लाभार्थी हयात आहे की नाही हे देखील तपासले जाईल. यासाठी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ईकेवायसी करणे अनिवार्य असेल. याशिवाय ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे. प्रत्येक लाभार्थी महिलेचे इनकम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाईल. तसेच अपात्र महिलांना वगळण्यासाठी जिल्हा स्तरावर फेरतपासणी करण्यात येईल. निकषात न बसणाऱ्यांना वगळण्यात येणार आहे.

error: Content is protected !!