सिंधुदुर्ग : सिंधु – रत्न संगीत भजनोत्कर्षक मंडळाची बैठक संपन्न रवळनाथ मंदिर ओरोस येथे संपन्न झाली. या सभेमध्ये भजन व डबलबारी बुवांसाठी पुढील नियमावली ठरवण्यात आली.
१) लेडीज जेन्ट्स बंदी (एक वर्षासाठी) नंतर विचार केला जाईल.
२) एका बुवाने दुसऱ्या बुवांना अरे तुरे ही भाषा बोलू नये.
३) एका बुवांची बारी चालु असताना दुसया बुवाने मध्ये बोलू नये
४) कुठल्याही बुवाने मद्यपान करुन भजन करू नये. (वादक सुध्दा) तसे आढळल्या त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
५) पुर्वीच्या बाऱ्यांप्रमाणे हिंदू धर्म संस्कृती टीकवुन भजनं करणे (गॉगल लावुन, तलवार घेऊन आणि विक्षीप्त हातवारे करू नये.)
६) युट्युबर्स यांनी बुवांची परवानगी घेउनच शुटींग करणे (आणि कॅप्शनमध्ये भडकाऊ शब्द लीहु नये.)
७) भजनाचा ऑर्केस्ट्रा होऊ नये फरमाईश शीवाय गजरात इतर गाणी गाऊ नये.
८) वेळेच्या बंधनानुसार सर्व फेऱ्या पुर्ण कराव्यात.
९) रुपावळ (वारकरी) पर्यंत सलग भजनं करावी गजर स्वतंत्र असेल त्याला सुध्दा वेळेचं बंधन घालून गजर करावा (वेळ ३५ ते ४० मीनीटे)
हे वरील सर्व नियम सिंधुदुर्गातील सर्व भजनी कलाकारांना लागु असून हे नियम जो कोणी हे नियम पायदळी तुडवेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे या बैठकीमध्ये सर्वानुमते ठरवण्यात आले.