शिंदे शिवसेनेचे डॅशिंग शिलेदार नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पारकर यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव
कणकवली : शिंदे शिवसेनेचे डॅशिंग शिलेदार आणि कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक सत्यजित उर्फ बाळू पारकर यांचा वाढदिवस रविवारी कणकवली येथील शिवसेना संपर्क कार्यालयात केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी बाळू पारकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवसानिमित्त आणलेल्या केकवरील “झुकेगा नही साला” ही टॅगलाईन सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. केक कापल्यानंतर उपस्थितांमध्ये या टॅगलाईनचीच जोरदार चर्चा रंगली होती.
या कार्यक्रमास शिवसेना उपनेते संजय आग्रे, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, नगरसेवक सत्यजित उर्फ बाळू पारकर, ओसरगाव पंचायत समिती सदस्या अक्षता राणे, महिंद्र सावंत, तालुकाप्रमुख दामू सावंत, समन्वयक सुनील पारकर, महिला तालुकाप्रमुख प्रिया टेंबकर, उपतालुकाप्रमुख सुनील हरमलकर,माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, चिन्मय राणे, प्रमोदशेठ मसूरकर, सुनील सावंत, बापुशेट पारकर, युवा नेते सौरभ पारकर, बंडू राणे, साईल शंकर दास, तेजस नार्वेकर, जय शेठये यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आदी उपस्थित होते.उपस्थितांनी पारकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.यावेळी नगरसेवक बाळू पारकर उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या प्रेमाने भारावून गेले.


Subscribe









