सावंतवाडी : मदर क्विन्स स्कूल, सावंतवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी (Umbrella Painting) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शाळेतील ५५ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यशाळेचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन बी. एस. बांदेकर कला महाविद्यालय, सावंतवाडी येथील प्रा. सिद्धेश नेरूरकर यांनी केले. सोबत सहाय्यक प्राध्यापक तुकाराम मोरजकर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, मदर क्विन्स स्कूलच्या प्राचार्या अनुजा साळगावकर, कला शिक्षिक श्री. कालवणकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध रंगसंगती, कल्पकता आणि सर्जनशीलतेचा वापर करून आकर्षक चित्रे साकारली. संपूर्ण कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.
कार्यशाळेदरम्यान बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी मृदुला ठाकूर आणि आर्या नागवेकर यांनी स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना चित्रकलेत मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना विविध चित्रशैली आणि रंगसंगती समजून घेण्यास मदत झाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला असून, शाळेने अशा सर्जनशील उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सुरू ठेवण्याचा मानस संस्थेने आणि प्रशालेने व्यक्त केला आहे.


Subscribe









