कुडाळ : ग्लोबल फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय या ठिकाणी मोफत संगणक प्रशिक्षण दिली जातात. उत्तम शिक्षण आणि उत्तम आरोग्य हे ध्येय ग्लोबलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये काही अंशी साकार करण्याचें काम होत आहे. याचाच एक भाग म्हणून कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबार्डे केंद्र शाळा नंबर १. या प्रशालेमध्ये दिनांक २७ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीमध्ये संगणक प्रशिक्षण आयोजित केले गेले. प्रशिक्षक श्री स्वप्निल नाईक सर यांनी मुलांना संगणकावर आधारित सत्रे व सादरीकरण यांचे तपशीलवार मार्गदर्शन केले. संगणक युगामध्ये प्रवेश करताना नवीन विद्यार्थी वर्गाला संगणकाची माहिती व ओळख आवश्यक आहे. ती या प्रशिक्षणा मार्फत देण्याचे काम होत आहे. शालेय मुख्याध्यापक श्री गोसावी सर यांनी या प्रशिक्षणांतर्गत विशेष सहकार्य केले. संगणक प्रशिक्षण समारोप प्रसंगी ग्लोबलचे व्यवस्थापक श्री प्रसाद परब सर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गोसावी सर, प्राधिकरणाचे श्री साजुराम नाईक, प्रशिक्षक श्री स्वप्निल नाईक सर,शालेय व्यवस्थापन चे माजी अध्यक्ष. श्री घाडी डॉक्टर, स्थानिक रहिवासी ग्लोबलचे सहाय्यक श्री उमेश गावडे सर, शालेय शिक्षक ठाकूर सर व अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या समयी मुलांची व मान्यवरांची मनोगते व्यक्त झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुर्वे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री ठाकुर सर यांनी मानले.

ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून वेताळबांबर्डे नंबर १ प्रशालेमध्ये संगणक प्रशिक्षण
1
/
96
चंद्रहास राणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कळसुली विभागप्रमुखपदी! #kankavli #kalsuli
तुमच्या आणि माझ्यासाठीच थांबलेत... नितेश राणेंनी मारली चक्क आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कुडाळ यांची गोसेवा #kudal
मंत्री नितेश राणेंनी मानले उदय सामंतांचे आभार #niteshrane #udaysamant
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
1
/
96

Subscribe










