रेल्वे पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी!

मुंबई प्रतिनिधी: रेल्वे प्रशासनाने आता आपल्या पेन्शन धारक कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली सुविधा आणली आहे. ज्यामुळे रेल्वे पेन्शन धारकांना बँकेत हेलपाटे मारायची गरज नाही.पेन्शनधारकांसाठी दरवर्षी बँकेत जाऊन हयातीचा पुरावा द्यावा लागतो. हा दाखला मिळवण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. मात्र, आता ही कटकट कायमची संपणार आहे. पेन्शनधारकांना आता जीवन प्रमाणपत्रासाठी दरवर्षी बँक किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. एका ॲपच्या मदतीने घरबसल्या सर्टिफिकेट बनवता येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची धावपळ वाचणार आहे.

कुठल्या विभागात आहे ही सुविधा?

रेल्वेने उत्तर पश्चिम रेल्वे विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा सुरू केली आहे. ही प्रणाली हळूहळू इतर झोनमध्येही लागू केली जाईल.रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उत्तर पश्चिम रेल्वे, कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने संयुक्तपणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रणाली लागू केली आहे. या अंतर्गत, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने नेशन वाईड डिजिटल लाइफ सर्टिफिकेट कॅम्पेन ३.० सुरू केले आहे. आता रेल्वे पेन्शनधारकांना दरवर्षी दिले जाणारे जीवन प्रमाणपत्रघरी बसन देता येणार आहे ॲपच्या मदतीने ती सुविधा घेता येईल .रेल्वे कर्मचाऱ्यांना या सुविधेचा सर्वाधिक फायदा मिळणार आहे.

८०० शहरांत मिळणार सुविधा

नेशन वाइड डिजिटल लाइफ सर्टिफिकेट कॅम्पेन ३.० च्या माध्यमातून ८०० शहरांमध्ये ही सुविधा दिली जाईल. नवीन सुविधा सुरू केल्यानंतर, उत्तर पश्चिम रेल्वेच्या ५० हजारांहून अधिक पेन्शनधारकांना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून त्यांचे पेन्शन पेमेंट मिळू शकणार आहे. यासाठीची सुविधा रेल्वेच्या सर्व झोन आणि विभागांच्या बँकांमध्ये चालवली जाणार आहे.

कसा वापरायचा ॲप?

रेल्वे मंत्रालयाकडून यासाठी एक ॲप लॉन्च करण्यात आले आहे, ज्याद्वारे फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे पेन्शनधारकाचा चेहरा स्कॅन करून जीवन प्रमाणपत्र जारी केले जाऊ शकते. १. यासाठी सर्वात आधी मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करावे लागेल. ॲपमधील स्कॅनर ओपन होताच मोबाईल चेहऱ्यासमोर धरावा लागेल. चेहऱ्याद्वारे तुमची ओळख पटली की प्रमाणपत्र तयार होईल. दूरवर राहणाऱ्या पेन्शनधारकांना या सुविधेचा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *