कुडाळ : श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट माड्याचीवाडी येथे शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
इयत्ता पाचवी ते सातवी या गटासाठी विषय
1) आई व वडील यांच्या विषयीआस्था
2) मी कोण होणार ?
इयत्ता आठवी ते दहावी या गटासाठी विषय
1) वृद्धाश्रमाची वाढती संख्या
2) मी वृद्धाश्रम बोलतोय..
असे विषय देण्यात आले आहेत.सदर स्पर्धेसाठी पेपर पुरवण्यात येतील.तसेच रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते चौथी या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत मुलांना चित्र असलेला ड्रॉइंग पेपर व स्केच पेन पुरवण्यात येतील . प्रत्येक गटासाठी फक्त पंधरा स्पर्धकांना सहभाग घेता येईल लहान गटासाठी पालक बरोबर असणे आवश्यक आहे.रंगभरण व निबंध स्पर्धेचा कालावधी दोन तास राहील. प्रथम तीन क्रमाकांना प्रत्येक गटात रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येतील सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येणार आहे. स्पर्धा संपल्यानंतर लगेचच बक्षिस वितरण समारंभ करण्यात येईल परीक्षकांचा निकाल अंतिम राहील. पालक व विद्यार्थी यांना चहा नाश्ता व स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
8806382977
9421913064













