युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी वाहिली श्रद्धांजली
कुडाळ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटची बातमी आज सकाळी सर्व वृत्तवाहिन्यांवर झळकली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. यावेळी अनेकांनी आपले दुःख व्यक्त केले. युवासेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी महाराष्ट्राचे लाडके दादा गमावल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली.
आज सकाळच्या सुमारास मुंबईहून बारामतीच्या दिशेने प्रवास करताना लँडिंग दरम्यान त्यांच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ६ जणांचा दुर्दैवी अंत झाला.
घड्याळ हे पक्षाचे अधिकृत चिन्ह असलेले अजितदादा घड्याळाची वेळ मात्र तंतोतंत पळायचे. वेळेचे तंतोतंत पालन करणाऱ्या अजितदादांवरच आज अशी वेळ येईल असा विचार कोणी स्वप्नातही केला नसेल.
त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला. महाराष्ट्रातील लहान मोठ्या अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्राने आपला लाडका दादा गमावला अशी प्रतिक्रिया व्यक्त करत युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.