चिपळूण : शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी गोमातेच्या रक्षणार्थ भव्य गर्जना सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सभेला संबोधित केले. आमच्या गो माता, आमच्या माता भागीनींवर अत्याचार करण्याचे, आमच्या जमिनी बळकावण्याचे धाडस करणाऱ्यांना आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. यापुढे तसेच उत्तर दिले जाईल. येत्या अधिवेशनामध्ये गोहत्येविरोधात कडक कायदा व्हावा यासाठी आवाज उठवणार आहेच. असे आवाहन आज चिपळूण येथे झालेल्या गर्जना सभेत उपस्थितांना केले. तर आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले.
यावेळी माजी आमदार डॉ विनय नातू, माजी आमदार सदानंद चव्हाण, अनिरुद्ध भावे, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत, उदय चितळे जिल्हा मंत्री, ह भ प भगवान महाराज कोकरे, मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, शिवसेना चिपळूणचे उमेश सकपाळ, चिपळूण ग्रामीण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, चिपळूण तालुका प्रमुख संदेश आयरे, तालुकधिकारी निहार कोवळे आदी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक फक्त दोन दिवस अगोदर सांगून सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Subscribe









