सिंधुदुर्ग : पर्यावरण स्नेही समाज निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण संवर्धनासाठी राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड शिवाजी वाचन मंदिर मालवण शारदा ग्रंथालय कसाल व वीर बलिदानी लेफ्टनंट कर्नल मनीष कदम कीर्तीचक्र शाखा ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने कापडी पिशवी निर्माण करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदरहू स्पर्धा ही सिंधुदुर्ग जिल्हयापुरती मर्यादित होती. सर्वसामान्य माहिती नुसार सिंधुदुर्ग जिल्हयात आयोजित केलेली ही पहिलीच अशा प्रकारची अभिनव स्पर्धा होती.
पुनर्वापर
२. बहुउपयोगी पिशवी (multipurpose bag attractive bag)
३. आकर्षक पिशवी (attractive bag)
अशा तीन प्रकारात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत एकूण २२९ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.तज्ञ अनुभवी परिक्षकांमार्फत यासर्व प्रवेशिकांचे परिक्षण करण्यात आलेले असून सदरहू स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे.
या उपक्रमाच्या आयोजनामध्ये श्री. रमेश राणे पणदूर, श्री. सुधिर कशाळीकर सावंतवाडी, सौ. सुप्रिया पवार वेताळ बांबडे, उमेद सिंधुदुर्ग, श्री. अमित नाईक स्वावलंबी भारत मिशन, श्री. रुपेश सुर्वे नेले, श्री. रविंद्र चिके तळेरे, श्री. शरद खरात, श्री. विष्णू निगुडकर पणदूर, श्री. चैतन्य बापट नारीग्रे, श्री. मंदार काणे पडेल, श्री. योगेश पोळ ओरोस, श्री. एकनाथ वानोळे ओरोस, श्री. अक्षय शेलटे पावशी यांचे विशेष सहकार्य लाभले व या उपक्रमात ज्या व्यक्तीनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार.