मनोज जरांगेंच्या उमदेवाराने केला विरोधकांनी गाडी जाळल्याचा बनाव?

मुंबई प्रतिनिधी: आज दिनांक ३ नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपले उमेदवार घोषित करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या वरूनच आता मनोज जरांगे पाटील यांच्या एका उमेदवाराने चक्क विरोधकांनी आपली गाडी जाळल्याचा बनाव केला आहे.यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.नांदेड जिल्ह्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे समर्थक उमेदवाराने स्वतःच्याच गाडीवर डिझेल टाकत ती विरोधकांनी जाळल्याचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठीच आपण हा प्रकार केल्याचे पोलीस चौकशीत त्यांनी कबुल केले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

शनिवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. एफ आय आर नुसार सेवा नगर तांडा, मुखेड ते चाहाणी रोड अपक्ष लोक परशुराम यांच्या डिझेलमधून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि गाडी जाळण्याचा प्रयत्न करत मराठा मोर्चाचे समन्वयक शाम वडजे फोनद्वारे कळवले.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन गाडी बोलवत आग विझविली होती. यानंतर परशुराम कदम आणि त्यांचा पुतण्या अक्षय कदम याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.

बनाव रचल्याची कबुली

यावेळी कदम यांनी ही गाडी काकाची असल्याचे सांगत उमेदवार कोण आहे अशी विचारणा हल्लेखोरांनी केल्याचा दावा केला होता. तसेच माझ्या अंगावर डिझेल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, परंतू आम्ही पळून गेलो असे सांगत बनाव रचला होता. प्रत्यक्षदर्शीनी मात्र गाडीत आणखी दोन महिला होत्या हे पाहिल्याचे पोलिसांना सांगितले होते. यामुळे पोलिसांना संशय आला होता.कदम काका-पुतण्याची चौकशी केली असता त्यांनी आपली गाडी कोणी जाळलेली नाही, मनोज जरांगे सहानुभूतीपोटी आपल्याला तिकीट देतील व प्रसिद्धी होईल या उद्देशाने आम्हीच गाडी जाळल्याचे त्यांनी कबुल केले. यानुसार खोटी माहिती देणे, सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवितास धोका आणि वाहनांस धोका निर्माण होईल असे कृत्य करणे याविरोधात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!