मत्स्य तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. सिंधुदुर्गात प्राणी संग्रहालय व्हावे अशी मागणी त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भारतातील पहिला पर्यटन जिल्हा अशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. या ठिकाणी प्राणी संग्रहालय झाल्यास येथील पर्यटनास चालना मिळेल. यासाठी लवकरात लवकर प्राणी संग्रहालय व्हावे अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.