धक्कादायक…अवघ्या८ वर्षाच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू

शाळेचे सीसीटीव्ही फूटेज आले समोर

मुलगी बेशुद्ध पडूनही काहीकाळ कोणाचा लक्ष नाही

अहमदाबाद: लहान मुलांमधे फास्ट फूडच्या अती आहारी गेल्यामुळे चीडचीड,जास्त वजन, मुले गतिमंद होणे,मधुमेह सारखे आजार आजकाल लहान मुलांमधे होताना दिसत आहेत.आता मात्र अनेक लहान मुलांमध्येही हृदय विकाराचा आजार वाढताना सुद्धा दिसून येत असून गेल्या दोन तीन दिवसात ३ घटना समोर आल्या आहेत.दरम्यान गुजरातमधील अहमदाबाद येथील शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या ८ वर्षांच्या मुलीचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अहमदाबादच्या थलतेज परिसरातील झेबर स्कूल फॉर चिल्ड्रनमध्ये आज सकाळी ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

गार्गी रणपारा असं मृत मुलीचं नावं आहे. गार्गी सकाळी तिच्या वर्गात जात असताना लॉबीमध्ये खुर्चीवर बसल्यानंतर लगेचच बेशुद्ध पडली,” असे शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिष्ठा सिन्हा यांनी सांगितलं. शाळा व्यवस्थापनाने शेअर केलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये, आठ वर्षांची मुलगी शाळेच्या लॉबीमध्ये चालताना दिसत आहे. तथापि, तिच्या वर्गात जाताना तिला अस्वस्थ वाटू लागतं. त्यामुळे ती लॉबीमध्ये खुर्चीवर बसते. त्यानंतर ती बेशुद्ध झाल्यानंतर खुर्चीवरून सरकताना दिसत आहे. ती कोसळली तेव्हा शिक्षक आणि इतर विद्यार्थी लॉबीमध्ये उपस्थित होते.

शाळेचे सीसीटीव्ही फुटेज

सकाळी शाळेत गेली तेंव्हा गार्गी व्यवस्थित होती. मात्र ती पहिल्या मजल्यावर तिच्या वर्गात जात असताना ती कॉरिडॉरमध्ये खुर्चीवर बसली आणि अचानक बेशुद्ध पडली. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, आमच्या शिक्षकांनी तिला सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) दिले आणि रुग्णवाहिका बोलावली,” असं सिन्हा यांनी पीटीआयला सांगितले. मुलीची प्रकृती गंभीर दिसत असल्याने, कर्मचाऱ्यांनी तिला त्यांच्या स्वतःच्या वाहनाने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी सांगितले की तिला हृदयविकाराचा झटका आला होता आणि व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं, मात्र तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं.

error: Content is protected !!