समृद्ध कोकण, विकसित कोकणासह आता “भगवे कोकण” असे मी म्हणेन: मंत्री नितेश राणे
सावंतवाडी: येथील भोसले नॉलेज सिटी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५९ व्या कोकण प्रांत अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे उपस्थित होते यावेळी बोलताना,हिंदू राष्ट्राला विकसित करण्यासह राष्ट्र सुरक्षित ठेवणेही तेवढेच आवश्यक आहे. आपली ती जबाबदारी आहे. हिंदुत्वासाठी कार्य करताना माझ्यावर ३८ खटले दाखल आहेत. धर्मासाठी घेतलेल्या या खटल्यांचा मला अभिमान आहे, असे मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे येथे म्हणाले.
विद्यार्थी परिषदेचा इतिहास वेगळा आहे. या संघटनेने देशाला नेतृत्व करणारे नेते दिले. त्यामुळे देशाच्या आणि हिंदूंविरोधात असणाऱ्यांच्या आडवे जाणे गरजेचे आहे. तो कडवटपणा आपल्यात असलाच पाहिजे, तरच देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करणार नाही, असेही मंत्री नितेश राणे म्हणाले. ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रा. डॉ. मनीष जोशी, स्वागत समिती अध्यक्ष अतुल पै काणे, प्रांत अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर, प्रांत मंत्री राहुल रजोरिआ आदी होते.













