श्री सदगुरु भक्त सेवा ट्रस्ट यांच्या विद्यमाने माड्याचीवाडी, येथेमन ही एक अ‌द्भुत शक्ती शिबिराचे आयोजन

१० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिबिराचे आयोजन;प्रवेश मर्यादित

कुडाळ(संतोष हीवळेकर): श्री सदगुरु भक्त सेवा ट्रस्ट यांच्या विद्यमाने श्री स्वामी समर्थ मठ, माड्याचीवाडी, कुडाळ येथेमन ही एक अ‌द्भुत शक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयावर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली असून आदरणीय सदगुरू माउलीच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलीत करून उदघाटन समारभ संपन्न होणार आहे. आपली सर्वाची उपस्थीती प्रार्थनीय आहे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कार्यशाळेची वैशिष्ट्ये :

अभ्यास प्रक्रिया म्हणजे नेमके काय?

अभ्यासाची गोडी कशी निर्माण करावी?

बुद्धीचा विकास कसा करावा?

मनाच्या निरनिराळ्या अवस्था (चेतन, अवचेतन, सुचेतन)एकदाच वाचून सर्व गोष्टी लक्षात कशा ठेवाव्यात?

ध्येय्य निश्चित कसे करावे?

ध्येय्य गाठताना येणाऱ्या अडथळ्यांस कसे सामोरे जाल?

मनाला सूचना कशा द्याव्यात?

आपली आत्मिक शक्ती व आत्मविश्वास कसा वाढवावा?

मोबाईलचा दुरुपयोग कसा टाळावा?

जीवनातील आई-वडिलांचे महत्त्व काय?

आत्मविश्वासाने परीक्षेला कसे सामोरे जावे?

ऋषीमुनींनी यश प्राप्त करण्यासाठी सांगितलेलाश्लोक म्हणजे नेमके काय?

स्मरणशक्ती वाढविण्याचे सूक्ष्म व्यायाम कोणते?

योगनिद्रा विद्यार्थ्यांसाठी एक वरदानपरीक्षेला जाताना अल्फा स्टेज कशी प्राप्त करावी

.रविवार दि. 29 डिसेंबर 2024 सकाळी 9.00 ते 5.30प्रवेश मर्यादित म्हणून आजच नावनोंदणी करा आणि निश्चिंत व्हा.प्रवेश शुल्क: 600/-

महत्त्वाची सूचना : या कार्यशाळेला विद्यार्थ्यांसोबत पालकांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. सोबत येताना पेन व वही घेऊन यावी.

अधिक माहितीसाठी संपर्क :

आनंद सावंत : 9420004182गिरीधर गावडे : 9420162810दिलीप सुतार : 9657650603सिद्धेश किनळेकर : 9403297888विजय सायल : 9820925090

error: Content is protected !!