कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्ध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण जोरदार तापलेल दिसून येत आहे. निवडणूक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची काल दिनांक 29 ऑक्टोबर शेवटची तारीख होती. आज प्रांत कार्यालय येथे अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू झाली असून. कुडाळ मालवण मतदार संघातील अपक्ष उमेदवार वैभव जयराम नाईक यांच्या अर्जावर हरकत घेतली आहे.
काय आहे हरकत?
वैभव नाईक यांच्या अर्जावरील सुचका पैकी जयराम प्रदीप नाईक यांची या अर्जावरील सही ही त्यांनी केली नाही अशी हरकत उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूसे यांनी याबाबत सही करणारे जयराम नाईक यांना प्रतिज्ञा पत्र देण्यात संदर्भात सूचना केल्या.
भाजप अमित ठाकरेंचा प्रचार करणार?
दरम्यान जयराम नाईक आपले प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे आले असता उबाठा कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार वैभव नाईक यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.यावेळी संजय पडते,राजू गवंडे, शेखर गावडे,बबन बोभाटे देखील उपस्थित होते. दरम्यान हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांसह दीपक नारकर, योगेश घाडी यांनी प्रयत्न केले.