उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्रात सद्ध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे, त्यातच महायुती व मविआ मधे जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू आहे. अशातच मित्र पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार आणि नाराज नेत्यांची समजूत या सगळ्यांमुळे यंदाची विधानसभा निवडणूक गाजणार अशी चर्चा होताना दिसतेय. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटप व तिकीट वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
४ नोव्हेंबरला काय घडेल?
आता अनेक मतदारसंघांमधील नाराजांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेला, अर्थात ४ नोव्हेंबरला काय घडेल, याविषयी तर्क-वितर्क चालू असतानाच माहीम मतदारसंघाबाबत देवेंद्र फडणवीसांनी मांडलेली भूमिका चर्चेत आली आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अमित ठाकरेंच्या प्रचाराबाबत?
माहीमबाबत भाजपाची काय आहे भूमिका?उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माहीम मतदारसंघ व अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत भाष्य केलं. “मुख्यमंत्र्यांचीही याला मान्यता होती की तिथे उमेदवार देऊ नये. पण त्यांना काही अडचणी आल्या. त्यांच्या पक्षाचं असं मत पडलं की तिथली मतं उद्धव ठाकरेंकडे जातील. त्यामुळे त्यांनी तिथे उमेदवार उभा केला आहे. पण आमची आधीपासून भूमिका होती की राज ठाकरेंनी या एका जागेवर पाठिंबा मागितला आहे, तर तो आपण दिला पाहिजे. आमचं कालही हेच मत होतं आणि आजही हेच मत आहे. सदा सरवणकरांबाबत आम्ही बसून बोलू तेव्हा ठरवू”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल













