कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर माझी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.दरम्यान त्यांचे खंदे समर्थक असलेल्या आनंद शिरवलकर यांची शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाली आहे . त्यांच्या या निवडीनंतर राजकीय क्षेत्रात त्यांचे अभिनंदन केले जात आहे.