आचरा येथील गावपळण उत्साहात

संतोष हिवाळेकर

आकाशाचे छत आणि जमिनीचे अंथरून सोबत वाडीतील ग्रामस्थांची कल्पकतेने सजवितलेल्या राहूट्या.या सजविताना कुणी केलेले आपल्या प्रेमळ व्यक्तींचे केलेले स्मरण यामुळे केवळ निवारा एवढाच उद्देश न राहता राहुट्या स्मृती निवास बनले आहेत.

त्यासोबतच कोणाची बाॅसगीरी नाही कटकटनाही कोणाचा दरारा नाही लहान थोर सगळे सारखेच यामुळे केवळ आणि केवळ मौजमजा खेळ कुदणे आणि चमचमत्या चांदण्यात भजन खेळ,नाच गाणे , चांदण्याचा प्रकाश आणि माडाच्या झापांच्या निवारयात निद्रिस्त होणे एवढाच दिनक्रम बनलेली गावपळण.
आणि हे सगळे अनुभवण्यासाठी चाकरमान्यांसोबत येणाऱ्या मित्र-मैत्रिणी पर्यटकांची होणारी गर्दी यामुळे आचरे गावची गावपळण परंपरा पर्यटकांसाठी इतरांसाठी इव्हेंट मॅनेजमेंटच ठरत आहे.
आचरा गावपळण रविवारी दुपारपासून सुरू झाली. एक रात्र सरली .आचरे
ग्रामस्थांच्या अंगात गावपळण अक्षरशः भिनल्यासारखी ग्रामस्थ वावरत आहेत. ” आता कोणाचा त्रास नाय वाटात तसा रव्हाचा आणि व्हाया तसा वावराचा अशा अविर्भावात आचरे वासिय वावरत नाहीत तर हुंदडत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

रविवारची गावपळणीची रात्र सर्वांना आनंदाची ठरली
करमणुकीसाठी भजन पावला नृत्याबरोबरच गोमू नृत्यानेही रंगत आणली होती. केवळ युवाईच या आनंदात सहभागी झाली नाही तर महिलाही त्यात वयोवृद्ध महिलांनीही फेर धरल्याचे दिसत होते. आणि हे सगळे अनुभवण्यासाठी या गावाचे गावपळणीशी संबंधित नसलेल्या व्यक्तीं केवळ गावपळण म्हणजे काय आहे हे अनुभवण्यात झालेले उपस्थिती यावरुन गावपण ही आचरे गावची रूढी परंपरा न राहता इतरांसाठी इव्हेंट ठरल्याचे दिसत आहे. याबाबत या भागात गावपळ टेलीफिल्म बनविण्यासाठी आलेले चित्रपट क्षेत्राशी संबंधित नंदू आचरेकर सुमित आचरेकर सांगतात.गावपळण हि प्रथा,त्याची संकल्पना आमच्यासाठी अत्यंत कुतूहालास्पद वाटत आहे .तीन-चार दिवसांकरता अख्ख गाव रिकामे होते. आणि ते सुद्धा घरातील गुरेढोरे, कोंबड्या कुत्र्यांचं हे पटत नसल्याचे ते म्हणतात .त्यामुळे खरोखरची गावपळण म्हणजे काय हे अनुभवण्यासाठी रविवारी आचरेत झालेली गर्दी,त्याची प्रसिद्धी करण्यासाठी आलेले युट्युबर्स यावरुन गावपळण या प्रथेची आजच्या युगातली महती समजते. आचरा काझीवाडी येथील राजू मुजावर यांनी सांगितले की आमचा आचरा गाव सर्व धर्मसमभावाचे प्रतिक आहे. त्यामुळे या प्रथेत आम्हीही सहभागी होतो.

पाहुणचाराची प्रथा गावपळणीतही


कोकणी माणूस येणारया पाहूण्यांचे आगत स्वागत करण्यात माहिर समजला जातो.गावपळणीतही ती ठायीठायी अनुभवण्यात येत आहे.गावपळणीत वेशीबाहेर राहिलेल्या ग्रामस्थांचे राहणीमान अनुभवण्यासाठी येणारया लोकांना,प्रसारमाध्यम प्रतिनिधिंना येथिल ग्रामस्थ राहुट्यात राहत असले तरी आग्रहाने चहापाण्यापासून अगदी जेवणा पर्यंत करत असलेला आग्रह आणि प्रेमाने होणारी सरबराई गावपळणीतील वेगळेपण दाखवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *