महायुतीतील खातेवाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून शिवसेना, भाजप, आणि राष्ट्रवादीच्या गटांमध्ये विभागणी झाली आहे. शिवसेनेच्या वाट्याला महत्त्वाची खाती आली असून, या विभागणीमुळे पुढील राजकीय समीकरणे निश्चित होतील. गेल्या मंत्रिमंडळातील महत्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार, अशी माहिती समोर आलीय. गृहखात भाजपकडे, तर नगरविकास शिवसेनेकडेच राहणार आहे. तर अजित पवार गटाला अर्थ खातं मिळणार आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपच्या ताब्यात राहणार. तर शिवसेनेचे उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला दिलं जाणार, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण शिवसेनेच्या ताब्यात जाणार असल्याची खात्रीदायक माहिती सूत्रांनी दिलीय.
येत्या 24 तासांत खाते वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. तर शिवसेनेची यादी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांना देणार येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची यादी उद्या दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसात राज्यपालांना संपूर्ण खाते वाटपाची यादी देणार आहेत.