मालवण प्रतिनिधी: स.का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या NCC राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत आज रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख पासून 7 किलोमीटर अंतर चढावर असणाऱ्या टिकलेश्वर मंदिरापर्यंत ट्रेकिंग कॅम्प करण्यात आला. या कॅम्पमध्ये 43 ncc विद्यार्थी सहभागी होते सिंधुदुर्ग कॉलेजने ट्रेकिंग कॅम्प एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक डॉ एम आर खोत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आला . Ncc विभागाचे सीनियर मनाली पालव, संतोष तांबे, राहुल जाधव,, प्राजक्ता नाईक, सिद्धी मराठे , दर्पणा जाधव, गौरी रेवणकर, प्रणव देवलकर, वैभव पाताडे, मिथुन मानवर विवेक पाटील, सुनील कुमार सैनी या सर्व सीनियरने या कॅम्पच्या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. प्राचार्य शिवराम ठाकूर यांनी या कॅम्प साठी शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर,, सीडीसी अध्यक्ष समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कुषे संस्थेचे सर्व संचालक मंडळ यामध्ये साईनाथ चव्हाण , संदेश कोयंडे , प्रमोद ओरसकर, डॉक्टर झाटये, विजय केनवडेकर , भाऊ सामंत, महादेव पाटकर व इतर पदाधिकारी या सर्वांनी या कॅम्प साठी शुभेच्छा दिल्या . 58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कॅम्पमध्ये ncc चे 43 या सर्वांना माझे सर्टिफिकेट विद्यार्थी सहभागी होते .त्याचबरोबर माजी एनसीसी सीनियर विनायक मानवर आणि अभिषेक एस एस सहभागी होते. विद्यार्थ्यांना खडतर प्रवासाची सवय व्हावी विद्यार्थी शारीरिक दृष्टीने सक्षम व्हावे , कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवन जगण्याची सवय लागावी ,भविष्यातील कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी किंवा सीमेवर जवान म्हणून भरती झाल्या नंतर युद्धासाठी सज्ज असण्यासाठी ट्रेकिंग कॅम्प अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी अशा प्रकारचे साहसी कॅम्प चे आयोजन करतो असे लेफ्टनंट प्राध्यापक खोतसर माहिती दिली.