सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल खळणेवाडी येथे ११ केव्ही विद्युत पोलच काम करताना कुडाळ महादेवाचे केरवडे येथील रूपेश अनंत डांगी (वय ३०) याचा शॉक लागून अपघात झाला. पोलवरून खाली कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळात त्याच निधन झालं.
तालुक्यातील माडखोल येथे विद्युत पोलच काम करण्यासाठी तो युवक गेला होता. कंत्राटदाराकडून पोल उभारण्याच कंत्राट घेण्यात आलं होतं. मयत युवक हा कंत्राटदाराचा कामगार होता. विद्युत पोलावर काम करण्यासाठी तो चढला असता विजेचा झटका त्याला लागाला. इन्सुलेटर बदलण्यासाठी तो पोलवर चढला होता. यावेळी
अचानकपणे शॉक लागल्यानं तो जमीनीवर कोसळून गंभीर जखमी झाला. ही घटना चारच्या सुमारास घडली. तेथे उपस्थित सहकारी कामगारांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू होते. अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे त्याला हलविण्यात येत होते. मात्र, उपचार सुरू असताना रक्ताची उलटी होऊन त्याचे दुःखद निधन झालं. घटनेची माहिती मिळताच पोलिस, महावितरण अधिकारी, ठेकेदार यांनी रूग्णालयात धाव घेतली होती. त्याच्या निधनान डांगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पुढील सोपस्कार पार पडले.