झाराप येथे श्री रामेश्वर संगीत विद्यालयातर्फे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’

योगिता कानडे/कुडाळ : श्री रामेश्वर संगीत विद्यालय विद्यार्थी परिवार यांच्या वतीने रविवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ठीक ३:०० वाजता ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्री भावई मंदिर, झाराप येथे संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे

पाहुण्यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन

विद्यालयातील विद्यार्थ्यांचा गायन आणि भजनाचा कार्यक्रम

विद्यार्थ्यांचे सामूहिक पखवाज सोलो वादन

उपस्थितांसाठी अल्पोपहार

विद्यार्थ्यांचा अभंग गायनाचा कार्यक्रम

गुरुवर्य श्री योगेश प्रभु आणि श्री आशिष सडेकर यांच्यासह ‘रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाट पंचक्रोशी’च्या सर्व कलाकारांचा विशेष भजनाचा कार्यक्रम

या संगीत व भक्तीमय कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, पालक आणि संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री रामेश्वर संगीत विद्यालय परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!