कलेश्वर विद्यामंदिरचा उपक्रम नेरूर चव्हाट्यावर गावठी बाजार रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन

कलेश्वर विद्यामंदिर नेरूर यांच्या वतीने चव्हाटा येथे गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

बाजारात विविध रानभाज्या तसेच पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या बाजाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व विक्रीचे काम शाळेतील विद्यार्थ्यांनीच सांभाळले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने आणि आत्मविश्वासाने ग्राहकांना वस्तू विकल्या.
स्थानिक रानभाज्या आणि पारंपरिक पदार्थांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य आणि स्वावलंबन वाढावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. आरोग्यदायी जीवनाची सुरुवात व शेतकऱ्यांचा सन्मान आणि सर्व काही रसायनमुक्त असा उपदेश दिला गेला.
यावेळी पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे, सौ दिप्ती नाईक, सरपंच सौ भक्ती घाडी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक, वालावल मंडळ अधिकारी श्री तारी भाऊ, विद्यामंदिर मुख्याध्यापक,शिक्षक, मोठ्या संख्येने ग्रामस्थ,पालक उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

error: Content is protected !!