इनरव्हिल क्लब कुडाळकडून चेंदवणमधील 25 महिला शेतक-यांना बहुउपयोगी शेतकरी किटचे वाटप

सौ रश्मी नाईक यांचा पुढाकार

कुडाळ : इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ व चेंदवणच्या माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक यांच्या पुढाकारातून चेंदवण येथील 25 महिला शेतक-यांना बहुउद्देशीय शेतकरी किटचे वाटप चेंदवण येथील श्री पाताळेश्वर मंदिर येथे करण्यात आले.
यावेळी इनरव्हिल अध्यक्षा सौ प्राप्ती तेली ,माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डाॅ सायली प्रभू,सचिव सौ प्राप्ती तेली,सौ रश्मी नाईक ,सौ प्रिती तायशेटये,सौ स्वप्नाली साळगावकर,सौ ऋतुजा परब ,सौ आरोहि माने ,सौ सई तेली,सौ पल्लवी बोभाटे,श्रीम वैशाली कुडाळकर,सौ भोगटे ,सौ ममता पोरे आदी उपस्थित होत्या.

बहुउद्देशीय किट वितरण

गेल्यावर्षी इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळकडून चेंदवण येथे 600 फळझाडेरोप वितरित केलेल्यामधील 25 महिला शेतक-यांना यावेळी बहुउद्देशीय शेतकरी किटचे वाटप चेंदवण येथे करण्यात आले.यामध्ये फळभाज्या बियाणे,ॲटी फंगल क्रिम ,गांडूळ खत,खुरपी आदि साहित्याचा समावेश आहे.यासाठी इनरव्हिल सदस्या सौ अनघा केसरकर ,सौ रश्मी नाईक व सौ आरोहि माने यांनी विशेष सहकार्य केले.
या अभिनव उपक्रमाचे प्रास्ताविक डाॅ सायली प्रभू यांनी केले तर चेंदवण पंचक्रोशीतील महिला शेतक-यांसाठी नेहमीच प्रयत्नशील असणा-या इनरव्हिल सदस्या तथा चेंदवणच्या माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक यांनीही महिला शेतक-यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!