कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली भेट.
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत असलेला बंगला काल दुपारी ३ ते ५ या वेळेत भर दिवसा फोडला होता. तसेच या नंतर काही अंतराने नांदगाव मधली वाडी येथे राहते घर फोडल्याचा प्रकार घडला होता. या पाश्र्वभूमीवर आज ठसे तज्ञ व शॉन पथक यांनी नांदगाव येथे घटनास्थळी येऊन तपासणी केली आहे. दरम्यान कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत दिनेश शशिकांत कोरगावकर यांचा बंगला आहे कोरगावकर हे काही दिवसापूर्वीच मुंबईवरून गावी आले होते सध्या पावसाळा असल्याने ते सर्व सावडाव या धबधब्या ठिकाणी काल दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास नांदगाव येथून धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. याच दरम्यान दिवसा चोरीचा प्रकार घडला होता. या चोरी मध्ये त्यांचे दोन महागडे मोबाईल चोरीला गेले तसेच स्मार्ट वॉच व काही रोख रक्कम चोरीला गेली होती. त्याच प्रमाणे नांदगाव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ झमने या नांदगाव मधली वाडी येथे भाड्याने राहत आहे. ते कामानिमित्त बाहेर गेले होते रात्री उशिरा ११ वा. पती पत्नी दोघेही घरी येतात तर घर फोडले होते. त्यांनी सर्व प्रथम नांदगाव पोलीस पाटील व नांदगाव सरपंच यांना माहिती दिली व दुरध्वनी द्वारे कणकवली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. या सर्व प्रकारामुळे आज नांदगाव येथे ठसे तज्ञ व शॉन पथक यांनी तपासणी केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
1
/
109
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
1
/
109


Subscribe









