दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नगरसेवक विलास कुडाळकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने आंबेडकर नगर मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

कुडाळ प्रतिनिधी

दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नगरसेवक विलास कुडाळकर व त्यांच्या कुटुंबीयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले तसेच स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केले.

दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या पन्नासाव्या जयंतीनिमित्त कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सुमारे ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले यावेळी जेष्ठ विजयकुमार धर्माजी जाधव, लक्ष्मण कुडाळकर, नगरसेवक विलास कुडाळकर, ममता जाधव, लक्ष्मीकांत कुडाळकर तसेच आदी कुडाळकर कुटुंबीय उपस्थित होते. या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील स्मशानभूमी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नगरसेवक विलास कुडाळकर, लक्ष्मीकांत कुडाळकर, सुधीर कुडाळकर, संतोष कुडाळकर, अरुण कुडाळकर, अनिकेत जाधव उपस्थित होते.

error: Content is protected !!